आपल्याकडची संत मंडळी हुशार होती. त्यांना माहीत होते की फक्त एकदा सांगून हा समाज बदलणार नाही. त्यांच्यावर चांगल्या गोष्टी सारख्या hammer कराव्या लागतील. तरच त्यातील काही गोष्टी लोकांच्या subconscious mind मध्ये जाऊन कायमस्वरूपी रुजतील म्हणून त्यांनी पद्याचा आधार घेतला. ओव्या, अभंग, चारोळ्या, भजन असे कित्येक प्रकार! आणि यांनाच मोठ्या संगीतकारांनी संगीत देऊन कायमस्वरूपी अमर केले. तसेच त्यांच्या नावाचे लोकांनी चांगले branding. Instead of ‘Late Kulkarni’ आपण संत ज्ञानेश्वर म्हणतो. ‘कै. अंबिले’ ऐवजी संत तुकाराम म्हणतो. यामुळेही यांच्या शब्दांना वजन येते. At the end जगाचे हीत सर्वात महत्त्वाचे हे यांना माहीत होते. म्हणून आपल्याकडची संत मंडळी हुशार होती.
