पावसावर केलेली कविता
झाली खूप दिवसांनी पावसाला माझी आठवण
जशी विरहानंतर होते डोळ्यांत अश्रूंची साठवण
जसा येतो जोमात तसाच जातो क्षणात
कसा रागवल्यावर राहतो नेहमी मनात
रिमझिम फक्त थेंबांची नाही
दरवळणाऱ्या सुगंधाचीही
इतर वेळी बेमोल मातीही
लाजवते अमूल्य परीसालाही
गोष्ट नसते फक्त सुगंधाची
असते त्याजोडीला आठवणींची
करतात त्या मन उल्हासित
तर कधी जातात दुःख पांघरित
तटस्थ राहणे हीच सुखाची गुरुकिल्ली
कारण भीती असते नेहमी अपेक्षाभंगाची
झाली खूप दिवसांनी पावसाला माझी आठवण
ज्यासाठी झुरतो निसर्गातील प्रत्येक कण
