यंदाच्या दिपावलीला
वदला निसर्ग मजला
नको ती फुलबाजी नको ती लक्ष्मी
असू दे फक्त तेजस्वी सौदामिनी
प्रवेश करतात अगदी गरजून
नकळत जातात अगदी विरून
ठेवून भान नेहमी सृष्टीचे
देतात वरदान अमृताचे
जपले त्याने आपणासी युगानुयुगी
वेळ आहे जपविण्याची काही क्षणी
तुका म्हणून थकला हे,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पण सारेच विश्व की भोगवादी रे
आतातरी थांबवू हे
वस्त्रहरण सृष्टीचे
नेसवू शालू कोमल तिला
जसा की थेट वृक्षवल्लींचा
