२०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातले होते. संपूर्ण देश बंद होते. Lockdown च्या काळात सरकार लोकांना घरी थांबण्याचे आवाहन करत होते. त्यावर केलेली ही कविता.
उरली एकच संधी आता
मारतो हाक देवाला
अन् देवही काय हा असा
अनुत्तरित राहिला हा
कर कटी ठेवून राही
उभा विटेवरी नेहमी
हा देव काय कामाचा
वाढतो कहर मृत्यूचा
विठूमेय बोले तळमळीनं
देव नका बघू मूर्तीत
देव पहा तुमच्या माझ्यात
देव पहा नमस्कारात
देव पहा अंतरात
देव पहा स्वच्छतेत
देव पहा म्हाताऱ्यात
देव पहा सफाई कामगारांत
देव पहा शूर पोलिसात
देव पहा वीर वैद्यात
आणि यंदाच्या घडीला तर,
देव राजकारणी नेत्यांत
टाळण्यासाठी मृत्यूचे तांडव
देवाने दिली हाक यांना
राहून घरी स्वतः च्या
राहू पाठीशी या देवांच्या
