Home कविता Ukhana – उखाणा

Ukhana – उखाणा

88
0

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचे लग्न होते. मी लिहिलेल्या रचना तिला बहुदा आवडत असाव्यात. म्हणून तिच्या लग्नासाठी उखाणा लिहायला सांगितले. गोपनीयतेच्या कारणास्तव मी नावे काढली आहेत. परंतु एकंदर context वरून तुम्हाला प्रसंग लक्षात येईल. बघा आवडतोय का माझा पहिला उखाणा.

जशी स्वराला लागते साथ तालाची

तशी निभावेन साथ आयुष्यभराची

मातीत मिसळता जल

सुगंधित झाला समय

दोघांच्या साथीने करू

आपले आयुष्य स्वर्गमय

अकस्मित भेट झाली आपुली

भेटींची झाली वचने सहजी

आयुष्यभर साथ निभावेल नक्की

सर्वाप्रिय ही सखी आपुली

भुलले मी आपुल्या पांडित्याला

त्याहूनही जास्त विनम्र स्वभावाला

प्रश्न पडला परक्यांमध्ये मी रमेल ना

नंतर प्रिय झाले आपल्याच सहवासाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here