जेव्हा मी ‘सलते काही बोच मनी’ हे अरजीत सिंग यांचे गाणे ऐकले तेव्हा हि कविता केली. 💔 प्रेयसीने प्रियकराला सोडल्यावर झालेली त्याची अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नको अबोला धरूस सखी तू
हृदयातील घाव सलतात मला क्रूर
पचवतो आहे नकार तुझा मी दूर
साथ माझी नको सोडूस कदापी
प्रयत्न केला तुला विसरायचा खूप
प्रयत्नांती विसरलो सगळे फक्त राहिलीस तूच
हिम्मत नाही झाली तुला replace करण्याची
सोबत नसलीस तरी वाटते रहावीस नेहमीं सुखी
एकटा मी बरा साथ आहे संगीताची
वाट बघेन शतजन्मी तुझी
आहेस माझ्या नशिबात खरी
आवडली असेल कविता तर
अभिप्रायाने होईल शांत माझे मन
सलणारे घाव तर निघणार नाहीत भरून
जगेन तुझ्याच सुखात माझे सुख मानून
