शिवाजी महाराज पुण्यात आल्यावर काय होईल हि कल्पना करून माझा पहिला पोवाडा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
हो राजे जी र जी. हो राजे जी…
राजं आलं पुनवडीत. पाहतात तर काय
त्याव्हा व्हती कशी पूनवडी….
आता झालीया कशी ही स्थिती
धरलिया अधोगतीची वाट
झालिया चिंतेचीच ही बाब…
इकड तिकड नुस्त दूषण
जिथं तिथं दिसतं भेसूर
जातीया गाडी नियमोडून
रयता गेली भ्रष्टाचारात
हो जी जी र जी… जी जी र जी!
प्रजेतील तरुण वर्गाकडे महाराजांनी पाहिले.
महाराजांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू निघाले
तानाजीने विचारलं, “राजं, काय झालं? कशापाई रडता व्ह?”
काय सांगू तानाजी, हे तरुण असे कसे दिशाहीन?
स्वराज्य उभे केले हे यासाठी?
आपल्यांचे रक्त सांडले हे यासाठी?
मदिरा काय, व्यसने काय?
प्रदूषण काय, भ्रष्टाचार काय?
दरिद्री काय, बेकारी काय?
असे का?
मी स्वराज्य निर्माण करून चुकलो का?
“थांब शिवबा…” जिजाबाई म्हणाल्या
“इथून पुढे एक शब्द बोलू नकोस. यांना वाट दाखव. नाहीतर तू खरंच चुकलेला असशील!”
आज शिवबा नाहीत परंतु पुढे अनेक शिवबा घडवणे हे या भूमीतच होऊ शकते. तर उचलू ज्ञानाची तलवार आणि कर्तव्याची ढाल. लागू कामाला व शिवरायांच्या वाटेवर जाऊन बनवूया अखंड भारताला विश्वविजेता!
