माझे संगीताचे गुरु पंडित सुधाकर तळणीकर यांनी संगीतबद्ध केलेला व मी गायलेला व लिहिलेला माझा पहिला अभंग
पंढरीच्या तीरी लाभे, सुख आणि शांती |
जैसी विटेवरी, उभी विठू माऊली नांदती ||
विठ्ठलाची छाया, लाभो आम्हा सदा |
जन्मू दे पंढरी, विश्र्वरुपी घरा ||
दुखः ची विठ्ठल, सुख ची विठ्ठल |
सगुण विठ्ठल, निर्गुण विठ्ठल |
अणुही विठ्ठल, रेणूही विठ्ठल |
शून्यची विठ्ठल, निरंतर ||
विठू माउली तू ग्यानाबा बोलती |
गोरांची ही पाप पुण्ये, मायनच घेती |
विश्वाला या हवी, थोडी अग्निरिती |
अग्नीतच पापे, दिसेनाशी होती ||
माऊली मुक्ती द्या भोगरूपी विश्र्वा |
दोष भोग दुखः चंद्रभागी तीरा |
संताचे हे पुण्य पंढरीसी रुजवा |
जन्मली पंढरी विश्र्वरूपी घरा ||