Home कविता Muktachand – मुक्तछंद

Muktachand – मुक्तछंद

133
0

काही दिवसांपूर्वी कवियित्री अबोलीचा मुक्तछंद वाचनात आला.

मुक्तछंद म्हणजे कुठल्याही वृत्त, अलंकार यात न बसणारी काव्यरचना. म्हणजे सगळेच गद्य मुक्तछंद होत नाही. वृत्त, अलंकार यामुळे आपसुकच गेयता येते. मुक्तछंदात छंदाचा वापर असतो, पण कुठल्या ओळीत कुठले छंद वापरायचे हे कवीचं ठरवत असतो.

कवितेचा हा नवीन प्रकार मला आवडला. प्रयत्न करून बघू म्हणले आणि सादर करत आहे माझा पहिला मुक्तछंद 😃


राबून राबून थकणारे हात आता
उमीद पण थकवून गेले सारे

डोळे न उघडता ऐकणे
कान न झाकता बघणे
हेच नशिबात होते माझ्या


ना आराम ना दाम ना मान ना पान
सर्व जसे कोमेजून गेलेले फुलच जणू
त्यातही अत्तराचा गंध आणि नभाचा रंग
शिवशक्तीची चेतना देऊन गेला


खूप भाग्यवान आहोत आपण
कारण दोन वेळचे पान व पुरेसा आराम
नवकोटांच्या भाग्यातही नसतो


ठेविले अनंते तैसेचि रहावे बरोबर
ते लागू होते फक्त अध्यात्मिक पातळीवर
मायावी जगात कर्तव्यांना पर्याय नसतो
ठेविले अनंते तैसेचि न राहावे
प्रगतीत असावे समाधान


थकलेल्या हातांना परत ताजेतवाने वाटू लागले
कारण उमिदच जणू गेली होती मायेच्या पलीकडे

Muktachand - मुक्तछंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here