दिनांक ३/ १२/ २०२१ रोजी माझ्या आजीचे निधन झाले. ना जन्म ना मृत्यू. हाती असतो फक्त प्रवास! माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, मला गाण्यासाठी लहानपणापासून प्रेरित करणाऱ्या, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे स्थान असणाऱ्या माझ्या प्रिय आजीला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻 😢🌼
सर्वात जास्त लाडकी होती माझी आजी
फक्त जीवापाड प्रेम करणारी माझी आजी
अष्टपैलुंनाही लाजवेल एवढी versatile माझी आजी
सुगरण, प्रवासी, भजनी मंडळाची शान माझी आजी
शिवणकाम, भरतकाम, jewellery expert माझी आजी
मनोभावे पूजा करणारी व शिकवणारी माझी आजी
गणपती, दिवाळी सर्व पूजापाठ स्वतः करणारी माझी आजी
अनेक कुटुंबे जोडणारी सर्वाप्रिय माझी आजी
माझ्यात संगीताचे बीज रोवणारी माझी आजी
आयुष्यातील पहिल्या गुरू देणारी माझी आजी
संगीताची खरी किंमत जाणणारी आणि जपणारी माझी आजी
तिला माझ्यापेक्षा जास्त आवडलेली माझी आजी
आज अचानक शोधतो सापडली नाही माझी आजी
जिथे असेल तिथे नक्की सुखात असणारी
व दुसऱ्यांनादेखील सुखात ठेवणारी माझी आजी
