लग्न म्हणजे काय हो भाऊ?
लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे जिव्हाळा
लग्न म्हणजे सुंदर क्षण
नेहमी हवाहवासा वाटणारा
पण आयुष्यात दुर्मिळच येणारा
लग्न म्हणजे जबाबदारी
तेव्हाच येते प्रेमाची प्रचिती
लग्न म्हणजे कविता जी संपूच नाही अशी वाटते
आणि खरं म्हणजे तीच आयुष्यभरासाठी असते
लग्न म्हणजे बंदिश जी अनेक रागातून फिरते
जी नेहमीच शेवटच्या श्वासापर्यंत बनलेली असते
लग्न म्हणजे सोहळा
लग्न म्हणजे जिव्हाळा
लग्न म्हणजे अशी आठवण
की जिच्यासाठी धडपडतो,
प्रत्येक जण
