माणूस एकटा येतो, एकटा जातो. या जगात कुणीच कुणाचं नसतं. एखादं भिरभिरतं पान पण आपल्याला खूप काही शिकवून जातं.
काय चुकतं कुठे चुकतं
कुणीच कुणाचं इथं नसतं
भिरभिरतं पान सुद्धा
खूप काही शिकवून जातं
कधी उन्हात कधी छायेत
आपापलं भिरभिरत असतं
भय नाही त्याला कशाचंच
ना कोंदट उन्हाच्या झळांचं
ना क्रूर थंडीतल्या गारठ्याचं
ना विक्राळ पावसाच्या सरींचं
ना विरळ गारपिटींचं
ना कौतुक जन्माच्या सोहळ्याचं
ना दुःख मृत्यूच्या तिरडीचं
जन्म काय मृत्यू काय
त्याला सर्व एकच काय?
शेवटी ते एकच शिकवतं
काय चुकतं कुठं चुकतं
कुणीच कुणाचं इथं नसतं
