गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे फक्त tags असतात
खरी नाती फक्त वागणुकीतून कळतात
कधी दिसतो वडीलांमध्ये मित्र
तर कधी आईमध्ये बहीण
रंगवूया आयुष्याचे छान चित्र
करुनी सर्वात मोठे यश प्राप्त
सर्व नाती महत्वाची असतात
जश्या फुलांना पाकळ्या असतात
पाकळ्यां शिवाय फुल ते कसले
नात्यांशिवय आयुष्य बेरंग झाले
नेहमी ताकद ठेवा step back करण्याची
Maturity ने गोष्टी handle करण्याची
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते
दिसणाऱ्याला ते एका श्र्वासातही सहज दिसते
तर आंधळ्याल्या मूर्तीतही मातीच दिसते
देव पाहायला जशी दृष्टी लागते
तशी पाषाण व मूर्ती एकरूप दिसते
माणूस एकटाच येतो एकटाच जातो
हिशोब लागतो यावर की आयुष्यात तो काय करतो
पाप पुण्य या तर फक्त कल्पना
अन्याय कधीच करू नका
सहन तर त्याहून करू नका
लिहिता लिहिता शाई संपेल
पण झाली आहे आता आरामाची वेळ
भेटू नक्की पुढच्या कवितेत
कशी वाटली AmeyOnLife ची भेट
