हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA
कधी भांडी घासता घासता
Deadline साफ होऊन जाते
मेहनतीचे होते चीज सारे
पण घरचे चीज संपलेले
माझी तुझी turn करण्याच्या नादात
ती नुसतीच turn करून जाते
हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA…
कधी छोटा तर कधी मोठा
एक तरी bug जरूर निघतो
तो दुरुस्त करता करता
दुसरा डोके वर काढतो
कधी perfection च्या नादात, नाही🙅
नेहमी perfection च्या नादात, हा😈
घरी तिसराच bug सापडतो
हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA…
कधीतरी कुणीतरी भेटते
कनेक्शन चांगले बनते
Canvas भरण्याच्या नादात
life canvas भरायचे राहते
त्यागाच्या अग्निमध्ये, थांब✋
घरचे तेल संपलेले 🤣
हे भलते अवघड असते
Maintain करणे GPA…
जन्मतः कधीच कुणी
झुक्या बनत नाही
ना असतो कुणी सुंदर
ना सत्य कष्टांशिवाय सत्या
सवयीचे गणित शिकल्यावर,
वेळेचे गणित सुटल्यावर
Logic चे आपोआप सुटते
हे भलते अवघड सोपे असते
Maintain करणे GPA…
