२०२१ मध्ये एका प्रसिद्ध राजकीय नेत्याने ‘गो कोरोना गो’ या घोषणेचा ट्रेंड चालू केला होता. त्यावर लिहिलेली ही कविता.
स्वच्छ धुवा आपले हात धो धो धो
गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो
असला उगम चिनी तरी
नाश करू आपल्या देशी
भीतीचे काही कारण नाही
Prevention असते cure नेहमी |
कोरोनाला या मारू सारे ठो ठो ठो
गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो ||
प्रत्येक बोट स्वच्छ करा
कोणाचाच भेद ठेवू नका
Curfew बरोबर पण मात्र
माणुसकीला विसरू नका |
वेळ नाही रडण्याची ही फो फो फो
गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो ||
तान्ह्यांना जपा, वृद्धांना जपा
स्वतः ला जपा, इतरांना जपवा
क्वचितच मिळणाऱ्या संधीचा या
कुटुंबासोबत आनंद घ्या
नका बाहेर पडू कारण
त्यांचा जीव धोक्यात घालतो आपण
बाहेर पडण्यास नेहमीच म्हणा नो नो नो
गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो
Share करा हे वाऱ्यासारखे सो सो सो
गो कोरोना गो कोरोना गो कोरोना गो
