गेले द्यायचे राहून
झालो घायाळ मी तुझ्यासवे
का गेलीस मन पोखरून
मोहरतो घेऊन चटके पावसाचे
क्लेश होतो बरसत्या झळातून
गेले द्यायचे राहून
काय सुचेना मनातून
शिकलो खूप जाणिवेतून
देता देता हातां ऐवजी
दिले मी स्वतः ला स्वतः हून
लागते स्वभावात प्रेम
जसे हवे अलंकारात हेम
हेमाशीवाय अलंकार कसला
प्रेमाशिवाय मानव पाशवी झाला
नका अपेक्षा करू याची कुणाही कडून
त्यांना कदाचित कळणारही नाही
गेले द्यायचे राहून…
असतो आपण स्वतःच प्रेम
जर मागितले तर होतो गेम
करा प्रेम स्वतःवर स्वतःहून
कधीच वाटू देऊ नका स्वतः ला
गेले द्यायचे राहून…
मिळते खूप ईश्वराकडून
ओळखा फक्त वेळेतून
आपण स्वार्थी फक्त म्हणू
गेले घ्यायचे राहून
मोहपाश सोडणे कठोर
जसा असतो रेशमाचा दोर
फक्त ठेवा घट्ट इच्छेचा जोर
यश येईल तुमच्याकडे स्वतःहून
फक्त कधीच वाटू नका देऊ
गेले द्यायचे राहून…
