Home कविता Father’s Day

Father’s Day

90
0

आज fathers day निमित्त माझ्या बाबांवर (अविनाश बनसोड) केलेली कविता!

इतका का प्रेमळ तू माझा बाबा

इतका का कठोर तू माझा बाबा

कधी जेवायला उशीर झाला

तर बळबळ मागे लागणारा

तर कधी पैशाच्या उधळपट्टीवर

सदा लगाम लावणारा

माझ्यासाठी वाट्टेल ते करणारा

पण स्वतः मात्र नेहमी compromise करणारा

स्वतः नेहमी चप्पल वापरणारा

पण मला woodland चे बूट घेणारा

मी पहिला आल्यावर पेढे आणणारा

व नापास झाल्यावर माझ्या पाठीशी असणारा

स्वतः ची गाडी चालू नसली तरी

संसाराची गाडी हुशारीने चालवणारा

त्सुनामी एवढ्या समास्यांपुढे

सागर तळासारखा शांत असलेला

माझी कणखर support system असणारा

मी कधी down असलो तर नेहमी हात धरणारा

इतरांचा नेहमी मान राखणाऱ्या

व स्वतःचा मान राखण्यास शिकवणाऱ्या

माझ्या बाबास Father’s Day च्या

खूप खूप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here