कॉलेज नंतर माझा पहिला जॉब हा Android Developer हा होता. आयुष्यात जेव्हा जेव्हा pure coding करण्याची वेळ आली तेव्हा लक्षात आले Coding एक साधना असते…
Coding एक साधना असते
जो तिची पूजा करतो त्यालाच ती साध्य होते
इतर साधनांसारखी ही कायमस्वरूपी नसते
जो कायम तिला जवळ ठेवतो त्यालाच ती नेहमी ती पुरून उरते
प्रश्न एक उत्तर अनेक असे असले तरी,
उत्तरांची उत्तरे शोधणाऱ्यावरच ती प्रसन्न होते
प्रसादरुपी सरस्वती बरोबर लक्ष्मी प्रसन्न होते
अशी ही coding ची साधना रियाजानेच साध्य होते
हिमालयाएवढ्या समस्या ती तर्जनिशी सोडवते
समस्या सोडवणाऱ्यासच तिची खरी महती कळते
जो तिची मनोभावे सेवा करतो त्यालाच ती साध्य होते
ज्याला ती साध्य होते त्याला ती नकळतपणे अमरत्व देते
