भाव अत्तराचे आज कोसळले
जेव्हा पहिल्या पावसाचे थेंब मातीत मिसळले
मिसळता थेंब मातीत, आले निसर्गास अवसान ,
येता सुगंध मातीचा, हरपले माझे भान
भान हरपूनी माझे, साधले नाते नभांशी
गर्जत गर्जूनिया मात्र, व्यक्त झाले अश्रूंनी
होते आधी कोमल जसा होता शुभ्र मल
झाला काळोख सरळ, साधला तो खास पल
कोसळल्या धारा नभातून, आले सर्व जल वाहून
डोळ्यातही माझ्या झाला, सुरू अश्रूंचा पाऊस
पाऊस ही तर फक्त सुरुवात, जशी दिव्याची असते वात
खरे सुख तर तेव्हाच, जेव्हा येईल सुर्य पूर्ण जोमात
म्हणतो खरे की नेसते सृष्टी शालू, पण एरवी मात्र तशीच राहू
एरवी साठी आपणच बनवूया आता, वृक्ष सुमनांचा कोमल शालू
येतो तो काही क्षणांसाठी, परंतु करतो निर्मिती युगांसाठी
मी अनुभवतो मात्र आनंदासाठी, शिकवतो मात्र आयुष्यासाठी
करा प्रेम सृष्टी सारखे स्वतः हून, कसलाही भेदभाव न ठेऊन
नका ठेऊ काही राखून, द्या सर्वत्र झोकून
दुःखातही शोधले सुख, जसे काळोखातही ऊन
जे नाही जमले सृष्टीला, ते केले मी स्वतः हून
