Home कविता Ayushya Dile – आयुष्य दिले हे

Ayushya Dile – आयुष्य दिले हे

91
0

दिसतो गुरु कुठल्याही फॉर्मात 🤣

आयुष्य दिले हे आईबाबाने,

जगायला शिकवले ते गुरूने |

सूर्याएवढे तेज नाही मात्र,

विराटता पुरून उरेल जास्त ||

हा दिसतो कोणत्याही फॉर्मात,

क्रश, फ्रेंड, बायको नवऱ्यात,

sis, bro अगदी ताईदादात,

नेहमी दिसतो आजीआजोबात |

एकदा आला की हा देतो नक्की,

आयुष्यभरासाठी मोठ्या शिकवणी ||

तो नाही बोलत कधी की, दे तुझा मला अंगठा,

पण चोरून बसतो मन मात्र आता काय सांगता |

असाच हा मस्त गुरु असावा,

प्रत्येकाच्या नशिबी पुरून उरावा,

शेवटी नशीबच म्हणेल की आता,

तोची देव जाणावा… 🙏 ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here