Home ब्लॉगविषयी

ब्लॉगविषयी

नमस्कार, मी अमेय. By profession मी सॉफ्टवेअर engineer आहे. कधीतरी काहीतरी सुचते, लिहावेसे वाटते व आपोआप कविता बनते. मला सुचलेल्या कविता, लेख, विचार प्रामाणिकपणे आपल्यासमोर मांडणे हाच या ब्लॉग चा उद्देश आहे. त्याचबरोबर ईश्वरकृपेने लाभलेली संगीताची कला आपल्याला ameyonlife या माझ्या YouTube channel वर अनुभवायला मिळेल. ameyonlife.com ला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून आभार! आपल्याबरोबरचा दुवा असाच अधिकाधिक मजबूत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏

जगायचं मरायचं काहीच आपल्या हातात नसतं
हातात फक्त लिहिणं असतं गाणं असतं

मरताना किती कमावले किती गमावले कुणी विचारणारं नसतं
पण काय दिले व कसे दिले हे सर्व जग पाहत असतं

यशाची हमी तर खुद्द ईश्वर देखील देऊ शकत नाही
खेदाची भावना तर मेलेल्या प्रेतावरूनही जात नाही

एका नश्वर देहातून या ईश्वर जगाला काहीतरी देणे लागते
त्याच देण्यामध्ये खारीचा वाटा ही माझी website करते