बिटकॉइन या cryptocurrency वर केलेली कविता
बिटकॉइन फिटकॉइन काही नसत
अस म्हणून तर जग फसत
Founder याचा नाकामोटो सतोशी
घेतले बँकांना याने आपल्या पायाशी
ना चेहरा ना ओळख ना पत्ता ना आधार
कोड च्या बेसिस वर झाला लाखोंचा आधार
आहे तर बिटकॉइन अगदीच अदृश्य
कोणालाच करता येत नाही याला स्पर्श
सिक्युरिटी encryption चा आहे हा अर्क
गफिलापणा केला तर जाईल सगळे व्यर्थ
तयार होतो फक्त संगणकावर
वापरता येतो फक्त संगणकावर
खरीदता येतो फक्त संगणकावर
विकता येतो फक्त संगणकावर
फक्त किंमत ठरते पुरवठा मागणीवर
कधी कधी होतो 25 दिवसात दुप्पट
तर कधी होतो 5 दिवसात अर्धवट
ज्यांचा असतो विश्वास त्यांना यश लाभत
नाहीतर बिटकॉईन फिटकॉईन काही नसत
अस म्हणून तर जग फसत
